Breaking News

इफ्फी २०२४ : अविस्मरणीय पद्धतीने असा रंगला इफ्फी २०२४ !!

ज्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी संपतात, त्याचप्रमाणे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 चा 28 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर समारोप झाला, परंतु निश्चितपणे सिनेमाची जादू आणि कथा सांगण्याची भावना आणि भविष्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी अनेक मार्ग उघडण्याच्या त्याच्या कायमस्वरूपी प्रभावासह. इफ्फीच्या 2024 च्या आवृत्तीला 11,332 प्रतिनिधी उपस्थित होते, जे इफ्फी 2023 च्या तुलनेत 12% अधिक आहे. 28 देशांतील आंतरराष्ट्रीय सहभागी तसेच देशातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.

चित्रपट बाजारपेठेच्या संदर्भात, प्रतिनिधींची संख्या गेल्या वर्षीच्या 775 पेक्षा लक्षणीय वाढून 1,876 झाली. परदेशी प्रतिनिधींनी 42 देशांचे प्रतिनिधित्व केले. या वर्षी चित्रपट बाजारातील व्यवसायाचा अंदाज 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे एक लक्षणीय कामगिरी आहे. 15 उद्योग भागीदारांसह टेक पॅव्हिलियन देखील सहभागी प्रतिनिधींसाठी एक मनोरंजक घटक होता. रु. चे प्रायोजकत्व. उद्योग भागीदारांकडून 15.36 कोटी रुपये प्राप्त झाले.

उद्घाटन आणि समारोप सोहळा

भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चंदेरी जगतातल्या अनेक नामवंत कलाकारांनी या महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला हजेरी लावली होती. उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमासृष्टीला शताब्दी वर्षानिमित्त तसेच भारतीय सिनेमाच्या समृद्ध वैविध्याला मानवंदना दिली गेली. तर, समारोप सोहळ्यात संगीत आणि नृत्याची शानदार मैफल सजली होती.

यावेळी उल्लेखनीय अपवादात्मक कारकिर्दिचा गौरव करताना फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केले गेले, तर अभिनेता विक्रांत मॅस्सी यांना वर्षातील भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा अर्थात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून गौरवले गेले.समारोप सोहळा : अभिनेता विक्रांत मॅस्सी यांना वर्षातील भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा अर्थात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान केला गेला..

आंतरराष्ट्रीय चित्रपट

वाचकहो, यंदाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात ‘इफ्फी’मध्ये 189 चित्रपटांची निवड केली गेली होती. सुमारे ,1,800 पेक्षा जास्त प्रवेशिका यासाठीआल्या होत्या, त्यातून हे चित्रपट निवडले गेले होते. यात 16 जागतिक प्रीमिअर, 3 आंतरराष्ट्रीय प्रीमिअर, 44 आशियायी प्रीमियर आणि 109 भारतीय प्रीमिअर्सचा समावेश होता.

या महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या 81 देशांमधील चित्रपटांनी विविध प्रकारच्या संस्कृती, त्यांचे विचार – तत्वे – मते आणि दृष्टीकोनाचे दर्शन घडवले. यंदाच्या महोत्सवातला स्पर्धात्मक विभागही खूपच रोमांचक होता. या विभागाअंतर्गत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुरस्कारासाठी 15 चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगली होती, तर युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषदेच्या (International Council for Film, Television, and Audio-visual Communication – ICFT) गांधी पदक विभागात 10 चित्रपटांमध्ये आणि दिग्दर्शक श्रेणीद्वारे सर्वोत्कृष्ट पदार्पणीय कथात्मक चित्रपटासाठी 7 चित्रपटांमध्ये अटितटीची स्पर्धा रंगली होती.

यंदाच्या महोत्सवात ऑस्ट्रेलियाचा समावेश विशेष लक्षवेधी देश म्हणून केला गेला होता. त्यामुळे या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या चित्रपटांना वेगळीच झळाळी मिळवून दिली. या विभागाअंतर्गत स्क्रीन ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या परस्पर सहकार्य विषयक कराराच्या अनुषंगाने सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे खेळ दाखवले गेले. त्यानुसारच या सोहळ्याचा उद्घाटनीय सिनेमा मायकेल ग्रेसी दिग्दर्शित बेटर मॅन हा ऑस्ट्रेलियायी चित्रपटाचा खेळ दाखवला गेला.टॉक्सिक’ या लिथुआनियन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला, रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला..

गाला प्रिमियर्स आणि रेड कार्पेट्स

पणजीमध्ये आयनॉक्स येथे आंतरराष्ट्रीय विभागातील 100 हून अधिक रेड कार्पेट इव्हेंट्स, इंडियन पॅनोरमा, गोवन सेक्शन आणि बियॉन्ड इंडियन पॅनोरमा प्रदर्शित करण्यात आले.

इंडियन पॅनोरमा

यावर्षी, इंडियन पॅनोरमा 2024 चा भाग म्हणून 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्सची त्यांच्या चित्रपट विषयक उत्कृष्टतेमुळे निवड केली गेली. निवड प्रक्रिया संपूर्ण भारतातल्या सिनेसृष्टीतील नामवंत व्यक्तींच्या पॅनेलद्वारे आयोजित केली जाते ज्यात फीचर फिल्म्ससाठी बारा ज्युरी सदस्य आणि नॉन फीचर फिल्म्ससाठी सहा ज्युरी सदस्य होते त्यांच्या संबंधित अध्यक्षांनी प्रत्येकाचे नेतृत्व केले.

सृजनशीलतेच्या भवितव्याला आकार देण्यासाठी युवकांची क्षमता ओळखून त्याला आकार देण्यासाठीच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, ‘यंग फिल्ममेकर्स’” ही इफ्फीची संकल्पना आहे.इफ्फीची संकल्पना “तरुण चित्रपट निर्माते” वर केंद्रित आहे, क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो व्यासपीठाची योजना मागील आवृत्त्यांमधील 75 संख्येच्या तुलनेत यंदा 100 तरुण प्रतिभांना समर्थन देण्यासाठी करण्यात आला. मंत्रालयाने देशभरातील विविध चित्रपट शाळांमधील सुमारे 350 तरुण चित्रपट विद्यार्थ्यांना इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले होते. भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी एक नवीन विभाग आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण भारतीय दिग्दर्शकाचा पुरस्कार स्थापित करण्यात आला आहे. तरुण निर्मात्यांसाठी मास्टरक्लास, पॅनल चर्चा, फिल्म मार्केट आणि फिल्म पॅकेजेस सर्व तयार केले गेले आहेत. इफ्फीएस्टा हे तरुणांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी एक मनोरंजन क्षेत्र सुरू केले आहे.

इफ्फीएस्टा

इफ्फीएस्टाने झोमॅटोच्या सहकार्याने, व्हेन चाय मेट टोस्ट आणि असीस कौर यांच्या कलाकृतींसह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खास समाविष्ट केलेल्या अदाकरीचा अनोखा संयोग घडवून आणणारे “डिस्ट्रिक्ट” नावाचे एक झळाळते मनोरंजन क्षेत्र तयार केले आहे. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे जे भारतीय चित्रपट सृष्टीचा समृद्ध इतिहास दर्शविणारे सफरनामा नावाने उभे केलेले खास प्रदर्शन, याव्यतिरिक्त, केंद्रीय संप्रेषण विभागाने एका विशेष अनुभव क्षेत्रात उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव प्रदान केला, ज्यामुळे ते कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण बनले. 6000 विद्यार्थ्यांसह एकूण 18,795 अभ्यागतांनी इफ्फीएस्टाचा आनंद घेतला.

इफ्फी 2024 मध्ये शताब्दी श्रद्धांजली

नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेला 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करणारा ऐतिहासिक उत्सव होता. अक्किनेनी नागेश्वर राव (ANR), राज कपूर, मोहम्मद रफी आणि तपन सिन्हा. त्यांच्या उल्लेखनीय वारशाची शताब्दी साजरी करून, या महोत्सवाने त्यांचे अतुलनीय योगदान बारकाईने रचण्यात आलेले कार्यक्रम, स्टॅम्प प्रकाशन, चित्रपट प्रदर्शन आणि अदाकारीद्वारे पुन्हा सादर केले.पुनर्रचित क्लासिक्स

इफ्फी 2024 मध्ये NFDC अर्थात नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाद्वारे सादर केलेल्या पुनर्रचित क्लासिक्स विभागात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशनचा एक भाग म्हणून NFDC-NFAI ने हाती घेतलेल्या चित्रपटांची डिजिटल पुनर्रचना केली आहे. हा विभाग NFDC-NFAI च्या भारतीय सिनेमाचे डिजिटायझेशन आणि पुनर्रचना करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांचे जतन करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करतो. प्रदर्शित केलेल्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये पुढील कलाकृतींचा समावेश होता:

उद्याची सर्जनशील मने

इफ्फी च्या 2024 या आवृत्तीत प्रभावी अदाकारी असलेल्या सहभागींची निवड झाली, ज्यात भारतातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून (UTs) चित्रपट निर्मितीच्या 13 श्रेणींमध्ये विभागलेले 1,070 अर्ज प्राप्त झाले. यामधून 71 पुरुष आणि 29 महिलांसह एकूण 100 सहभागींच्या निवडीचा समावेश आहे (वर्ष 2023 मध्ये सहभागी झालेल्या 16 महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ). या सहभागींनी 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व केले आणि कार्यक्रमात विविध प्रकारच्या अभिव्यक्ती आणि अनुभव आणले.

महोत्सवादरम्यान, प्रत्येकी 10 सहभागींच्या संघांनी 48 तासांत पाच लघुपटांची निर्मिती केली. यात हिंदीमध्ये गुल्लू (दिग्दर्शक: अर्शली जोस), कोंकणी आणि इंग्रजीमध्ये द विंडो (दिग्दर्शक: पियुष शर्मा), इंग्रजीमध्ये वुई कॅन हिअर द सेम म्युझिक (दिग्दर्शक: बोनिटा राजपुरोहित), लव्हफिक्स सबस्क्रिप्शन (दिग्दर्शक: मल्लिका जुनेजा) इंग्रजी आणि हिंदी/इंग्रजीमध्ये हे माया (दिग्दर्शक: सुर्यांश देव श्रीवास्तव) यांचा समावेश होता. या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या ग्रँड ज्युरीने पुढीलप्रमाणे विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपट – गुल्लू (अर्शली जोस), प्रथम उपविजेता – वुई कॅन हिअर द सेम म्युझिक (बोनिटा राजपुरोहित), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अर्शली जोस (गुल्लू), सर्वोत्कृष्ट पटकथा – अधिराज बोस (लव्हफिक्स सबस्क्रिप्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – विशाखा नाईक (लव्हफिक्स सबस्क्रिप्शन), आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पेंद्र कुमार (गुल्लू).मास्टर क्लासेस

इफ्फीने आठवडाभरात 30 मास्टर क्लास , चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केले. त्यात चित्रपटसृष्टीतील मान्यवर सहभागी झाले होते. फिलिप नॉयस, जॉन सील, रणबीर कपूर, ए.आर. रहमान, ख्रिस किर्शबॉम, इम्तियाज अली, मणिरत्नम, सुहासिनी मणिरत्नम, नागार्जुन, फारुख धोंडी, शिवकार्तिकेयन, अमिश त्रिपाठी आणि इतर अनेकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

22 नोव्हेंबर रोजी झालेल्या मणिरत्नम यांच्या सत्रात सर्वाधिक 89% उपस्थिती होती आणि सभागृह खचाखच भरले होते, तर त्या खालोखाल रणबीर कपूरच्या सत्रात 83% लोक सहभागी झाले.

विद्यार्थी चित्रपट निर्माता कार्यक्रम

या कार्यक्रमात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटी आयआय), सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), एसआरएफटीआय अरुणाचल प्रदेश, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) यासारख्या 13 नामांकित चित्रपट प्रशिक्षण संस्थांचे 279 जण आणि इतर राज्य सरकारी तसेच खाजगी संस्थांचे मिळून एकूण 345 विद्यार्थी सहभागी झाले.

त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यांतील 66 विद्यार्थी आणि युवा चित्रपट निर्मात्यांची निवड या सत्रासाठी करण्यात आली.

इफ्फीच्या वार्तांकनासाठी मान्यता मिळावी म्हणून पत्रसूचना कार्यालयाकडे (पीआयबीकडे) देशभरातून प्रसारमाध्यमांनी जवळपास 1,000 अर्ज केले होते. त्यापैकी 700 हून अधिक पत्रकारांना ही मान्यता (अक्रिडेशन) मिळाली. ज्या पत्रकारांना अधिक रूची होती त्यांच्यासाठी एफटीआयआयच्या सहकार्याने एक दिवसीय फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स उपलब्ध करण्यात आला.इफ्फी 2024 ला वेगवेगळ्या व्यासपीठांवर व्यापक प्रसिद्धी मिळाली.

फक्त मुद्रित माध्यमाचा विचार केला तर टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाईम्स, मिडडे, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू आणि इतर अनेकांसह आघाडीच्या राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये इफ्फीबद्दल 500 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले. यावरून या चित्रपट महोत्सवाचे महत्त्व लक्षात येते. इफ्फीबद्दल मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्रसारही करण्यात आला.

बॉलीवूड हंगामा, पिंकविला सारखी प्रमुख मनोरंजन संकेतस्थळे तसेच लाइव्हमिंट आणि इकॉनॉमिक टाइम्स सारख्या व्यवसायिक प्लॅटफॉर्मवर 600 हून अधिक ऑनलाइन लेख प्रकाशित झाले. त्याशिवाय इफ्फीची पोहोच वाढवण्यासाठी समाजमाध्यमांवर पकड असलेल्या 45 वापरकर्त्यांनी MyGov द्वारे इफ्फीची लोकप्रियता वाढवण्याचे काम केले. त्यामुळे विविध डिजिटल व्यासपीठांवरही इफ्फीविषयी डंका वाजला.

पीआयबीच्या माध्यमातून इंग्लिश आणि सहा परदेशी भाषांमध्ये अधिकृत हँडलवरून 26 देशांना इफ्फीची माहिती दिली जात होती. हे परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इफ्फीने व्हरायटी आणि स्क्रीन इंटरनॅशनलशी भागीदारी केली. त्यांच्या जागतिक सदस्यांना तीन ई-दैनिके पाठवण्यात आल्यामुळे इफ्फी महोत्सव गाजला.

  • क्षितिज टीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *