राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पटकथा लेखक प्रयोगशाळेबद्दल:
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) ला या वर्षी 21 राज्यांमधून 150 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या, त्यापैकी 6 प्रकल्पांची एनएफडीसी पटकथा लेखक प्रयोगशाळेच्या 18 व्या आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातील प्रतिभावंतांना हेरून त्यांचा विकास करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे सहा पटकथा लेखक जाहिराती, लघुपट, कादंबरी, माहितीपट आणि चित्रपटांचे निर्माते –दिग्दर्शक आहेत. त्यांनी हिंदी, उर्दू, पहाडी, पंजाबी, आसामी, मल्याळम, कोन्याक, इंग्रजी आणि मैथिली सह अनेक भाषांमध्ये पटकथा लिहिल्या आहेत.
एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळा 2024 साठी निवडलेले 6 प्रकल्प तुम्ही येथे पाहू शकता.
वर्ष 2007 पासून फिल्म बाजार विभागात समाविष्ट करण्यात आलेला एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळा हा एक महत्वपूर्ण उपक्रम असून, उदयोन्मुख प्रतिभावंतांना नावाजलेले पटकथाकार आणि उद्योगातील तज्ञांकडून मार्गदर्शन देऊन त्यांना अधिक समृद्ध करण्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत कथा पोहोचवणे आणि पटकथाकारांना स्वतःची ओळख प्राप्त करून त्यांना पाठबळ मिळावे यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे यावर या उपक्रमाचा भर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रयोगशाळेतील अनेक चित्रपटांना समीक्षकांची कौतुकाची थाप मिळाली असून त्यांना व्यावसायिक यश देखील मिळाले आहे. कोन्याक त्याच पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाण्यासाठी सिद्ध आहे.
- प्रवीण गांगुर्डे