Breaking News

KBC 16 मध्ये नाना पाटेकरने अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगून प्रेक्षकांना रिझवले

या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसेल, तो या भागाचा हायलाइट असेल. काही वेधक किस्से आणि आठवणी सांगून तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसेल. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरचा उद्देश आहे.


एका हृदयस्पर्शी क्षणी, नाना पाटेकरने ‘नाना’ शब्दाशी निगडीत एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमितजी आले आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागले. मी त्यांना विचारले की काय बातमी आहे? त्यावर ते म्हणाले, “माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!” त्यावर आपल्या विनोदबुद्धीबद्दल ओळखल्या जाणाऱ्या नानाने टिप्पणी केली, “किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.”


संभाषणाच्या ओघात नाना पाटेकरने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक गोड आणि व्यक्तीगत आठवण शेअर केली. तो म्हणाला, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.”

नाना आणि अमिताभ बच्चन यांच्या सहवासात संस्मरणीय रजनी अनुभवा आणि त्यांच्या दैदीप्यमान करकिर्दीतील काही खास किस्से ऐका. या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 चा हा विशेष भाग बघायला विसरू नका, रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *