kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘कलार्पण’तर्फे पं. सुधाकर तळणीकर आणि कवी अमेय बनसोड यांच्या गायनाचा कार्यक्रम , ‘काव्यमेय’ कवितासंग्रहाचेही प्रकाशन !

पुण्यातील ‘कलार्पण’ संस्थेतर्फे सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम आणि अमेरिकेतील गायक कवी अमेय बनसोड यांच्या ‘काव्यमेय’ कवितासंग्रहचे प्रकाशन शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी, दुपारी १ वाजता भरत नाट्यमंदिर, सदाशिव पेठ, पुणे , येथे आयोजित करण्यात आला आहे.

गायक सुरमणी पं. सुधाकर तळणीकर आणि ‘काव्यमेय’ काव्यसंग्रहाचे कवी गायक अमेय बनसोड (अमेरिका) हे कार्यक्रम सादर करतील. मंदार तळणीकर (सहगायन व हार्मोनियम) आणि पल्लवी लोखंडे (सहगायन) हे असतील, याशिवाय वाद्यसंगत केदार तळणीकर (तबला) आणि गणेश पापळ (पखवाज) करणार आहेत. या कार्यक्रमात ‘काव्यमेय’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुरमणी पं. सुधाकर तळणीकर यांच्या हस्ते संपन्न होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.