Breaking News

ढोले पाटील स्कूल फॉर एक्सेलन्सच्या प्री प्रायमरी सेक्शनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ढोले पाटील एज्यूकेशन सोसायटी,खराडी मधील ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेंन्स् प्री प्रायमरी विभागतील वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या मध्ये नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनियर केजी,इयत्ता १ली व इयत्ता २ री मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनिअर केजी च्या मुलांनी नातेसंबंधाचे महत्व या थिम वर वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केले.तसेच इयत्ता १ली च्या विद्यार्थानी जीवनात हसणे हे योग्य औषध आहे.या थीम वर वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यानी प्रेरणा या थीमवर वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य सादर केले. यामधे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल रुप सादर करण्यात आले आणि स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांचे योगदान नृत्यातून सादर करण्यात आले.तसेच वडिलां बद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या गीतावर नृत्य सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील तसेच संस्थेचे सेक्रेटरी उमा सागर ढोले पाटील,संस्थेचे सर्व मुख्याध्यापक,विभाग प्रमुख,शिक्षक उपस्थित होते.

आजच्या या जगात लहान कुटुंबा मुळे नाते संबंध दुरावत चालले आहे.या नात्याचे महत्त्व लहान मुलांच्या मनामध्ये रुजले गेले पाहिजे ते लहान मुलांना सांगितले पाहिजे असे संस्थेचे चेअरमन  सागर ढोले पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका आरुषा मजली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.तसेच मुख्याध्यापिका डॉ. अनुराधा अय्यर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *