एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आजच्या युवकांनी देखील जपावा. पुण्याला लाभलेला हा वारसा आहे तो आपण जपलाच पाहिजे असे मत पुण्याचे कमिशनर आणि डायरेक्ट ऑफ लॅड रेकॉर्डसचे डाॅ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो 2025 प्रदर्शनाच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी द अॅग्री – हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार, संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्वस्त अनुपमा बर्वे, सुमन किलोस्कर, डॉ श्रीनाथ कवडे, बाळासाहेब शिवरकर, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
सुहास दिवसे म्हणाले, “संपूर्ण महाराषरात हा मोठा इव्हेंट आहे.हा इव्हेंट एक सणा सारखा साजरा होतो. उदघटना पूर्वीच इथे पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली आहे. हा पुण्याला मिळालेला वारसा आहे जो पुढे ही असाच चालू रहावा. प्रतापराव पवार, सुमन किर्लोस्कर या जेष्ठनी अधिरात प्रयत्न करून ही परंपरा जपली आहे. आता अनेक युवकांनी ही परंपरा जपण्याचे हाती घेतले आहे ते पुढे असेच यशस्वी होतील. या 3 दिवस चालणाऱ्या इव्हेंट मध्ये अनेक वेगवेगळे फुल झाडी, नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक वृक्षाची लागवड केली आहे ते ही तुम्हाला पाहायला मिळतील. तर सर्व पुणेकऱ्यांना आवाहन आहे या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.”
अॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात. ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल.या उद्देशाने अॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सुरवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते. मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरविले जाते त्यामध्ये अबाल- वृद्धांचा सहभाग असतो. सर्वसामान्यांचा पुष्पप्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढविण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे, इ. गोष्टींच्या स्पर्धा या निमिताने आयोजित करण्यात येतात. तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.केवळ स्पर्धे पुरते मर्यादित न राहता. पुष्प प्रर्दशनानिमित्ताने बागेस भेट देणार्या पुष्प रसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो.
पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षक रीत्या सजविण्यात येते. त्यामुळेच तर पुष्प रसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात.पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. यंदाच्या वर्षी देखील ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 27 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे 1000 ते 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता .
या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षदिखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती, तसेच गुलाबाच्या अनेक प्रजाती देखील या प्रदर्शनात पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील.
उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी पुण्यसह इतर अनेक ठिकाण्याहून अनेक नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.