kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात जीबीएसमुळे सिंहगड परिसरात पहिला बळी गेला असून मृत महिला 56 वर्षीय आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती. 15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. आता तिचा मृत्यू झाला आहे. याआधी जीबीएस रुग्णामुळे सोलापूर येथील एकाचा मृत्यू झाला होता.

राज्यातील तसेच पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे 127 रुग्ण आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच्या सात सदस्यीय पथकानं 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली.

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश होता.

दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.