kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …

संपूर्ण देशाचे लक्ष बजेटकडे लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारनं दशकातील सर्वात मोठा दिलासा नोकरदार वर्गाला दिलाय. 12 लाखांचं उत्पन्न कर करण्याची घोषणा ही बजेटमधील सर्वात महत्वाची घोषणा आहे. बेजटमध्ये देशातील विविध राज्यांसाठी देखील बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची मागिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

मध्यमवर्गासाठी हे ड्रीम बजेट असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर नव्या कररचनेमुळे नोकरदारांना मोठा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बजेटचं कौतुक केलं आहे. मेट्रो प्रकल्प, हायस्पीड रेल्वे या विविध योजनांसाह अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, ही केवळ प्राथमिक माहिती असून विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

मुंबई, पुणे मेट्रो, हायस्पीड रेल्वे
मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
पुणे मेट्रो : 699.13 कोटी
एमयुटीपी : 511.48 कोटी
एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी