अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच – सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स तर्फे रांका मिस / मिसेस / मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शो मोठ्या दिमाखात एलप्रो मॉल,चिंचवड येथे संपन्न झाला.
यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, रांका ज्वेलर्स चे शिवम अरोरा, बिग बॉस मराठी फेम अभिनेता वैभव चव्हाण, कशिश प्रॉडक्शन्स च्या ब्रँड ॲम्बेसेडर स्नेहल नार्वेकर,केतकी शिरबावीकर, निलाक्षी जाधव,स्वरूप रॉय, डॉ. निखील गोसावी, डॉ. शशिकांत शेटे, अंजली रघुनाथ वाघ, दीपाक्षी, गौरी दवे, अर्चना माघाडे, रिया चौहान, पूजा वाघ, प्रियांका मिसाळ, काजल शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमांबद्दल शिवम अरोरा म्हणाले,महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शो ची संकल्पना मांडली ती तेजपाल रांका यांना अतिशय महत्वाची वाटली, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही या फॅशन शो चा भाग झालो आहोत.या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला रांका ज्वेलर्स तर्फे फोटोशूट तसेच चांदीचे नाणे देण्यात आले.
अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, मी अनेक फॅशन शो बघितले, उपस्थित राहिलो आहे, मात्र रांका मिस / मिसेस / मिस्टर ग्लोबल इंडिया फॅशन शो एक अनोखा अनुभव माझ्यासाठी होता, कारण पुण्याचे पॅडमॅन अशी ओळख निर्माण केलेल्या योगेश पवार यांच्या संकल्पनेतून हा शो महिलांच्या आरोग्य विषयक जनजागृती आणि सुरक्षा या विषया भोवती गुंफन्यात आला होता.
फॅशन शो विषयी बोलताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने यंदाच्या महिला दिना निमित्त हा फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये महिलां मध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदीं बाबत जनजागृती करण्यात आली.
विजेते: पौर्णिमा अंबारगे, श्रेया सिद्धार्थ, दिप्ती पापरकर, अथर्व भंगाळे, उन्नती चव्हाण, राजवीर राजपूत, शनाया कोठाडिया
उपविजेते: हिमाली सावे, साक्षी परदेशी, श्रद्धा थोरात, आर्या शिरडकर, सुनिता गुप्ता, वर्षा गुजराथी, विशाल माघाडे, रोहित राठोड, खुशी मोहिते, किष्मिश काळे, श्लोक ठाकरे, विहान पाटील, अनिशा बोकील, प्रिशा श्रीवास्तव