पुणे हे विद्येचे माहेरघर , सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडत असलेल्या घटना पाहाता ही ओळख पुसली जाते की काय अशी भिती निर्माण होत आहे. एकीकडे तरुण मुलं मूळ नशेच्या आहारी गेली आहेत असं दिसून येत आहे तर दुसरीकडे चोरी, बलात्कार, मारहाण हे घडत असल्याचे दिसत आहे.
स्वारगेट प्रकरण गाजत असतानाच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढलेली गुन्हेगारी, टोळीयुद्ध, नशेखोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपरीतील एका वसाहतीमध्ये केवळ नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने एका माथेफिरुने 13 दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीला अटकही केली आहे. पिंपरी बीआरटी रोडवर एका टोळक्याने चक्क 10 ते 15 गाड्यांची विनाकारण तोडफोड केली आणि चारचाकी कारच्या काचा देखील फोडून टाकल्या.
तर दुसरीकडे पुण्यातील धनकवडीसारख्या गजबजलेल्या भागातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. या भागात एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. या आयुर्वेदिक उपचार केंद्रात भलताच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. काही टपोरींनी इथं काम करणाऱ्या महिलांना धमकावलचं नाही तर नको त्या गोष्टी ही करायला भाग पाडल्या. या मुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील धनकवडी भागात एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. या केंद्रावर उपचार घेण्यासाठी दोघे जण आले होते. तिथे मसाज करण्यासाठी महिला होत्या. आपल्याला तिळाच्या तेलाने मसाज करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी सांगेन तसं केलं नाही तर तुमचं उपचार केंद्र बंद करेन अशी धमकी ही त्यांनी दिली. त्यानंतर मसाज करणाऱ्या महिलेला तिचा टॉप काढून मसाज करायला भाग पाडले. मसाज करत असताना त्यांनी त्या महिलांचे व्हिडीओ ही काढले. त्यानंतर तिथे आणखी दोघे जण आले. आताच्या आता आम्हाला 20,000 हजार रुपये द्या अशी मागणी केली. नाही दिले तर मसाज करतानाचे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली. त्यावेळी त्या उपचार केंद्रावर तेवढे पैसे नव्हते. मग त्या लोकांनी गल्ल्यात असलेले 800 रुपये घेवून तिथून पळ काढला. त्यानंतर याबाबतची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली. मात्र सीसीटीव्ही नसल्याने आरोपींची कोणतीही माहिती मिळत नव्हती. अशा स्थितीत तपास करण्यात आला.
तर, इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोन गटात झालेल्या भांडणांमध्ये आई आणि मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली असून यामध्ये सात जणांविरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ताहेरा युनुस काझी (वय 45 वर्षे व्यवसाय शेती रा. लुमेवाडी ता इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी त्यांचा मुलगा खालिद आणि आरोपी साजीद सलावुददीन शेख, अमीर नुरूददीन शेख, सययद नुरूददीन शेख, नुरूददीन फकुददीन शेख, अरबाज सलायुददीन शेख, आबीद नसरूददीन शेख, तंजीम फजलुददीन शेख (सर्व रा. लुमेवाडी ता इंदापुर) असे सर्वजण जमीनीच्या हदिदबाबत चर्चा करीत असताना साजीद सलावुददीन शेख व अमीर नुरखुददीन शेख व आरबाज सलावुददीन शेख या तिघांनी फिर्यादीचा मुलगा खालीद यास हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडओरडा केला असता त्या तिघांनी फिर्यादीसही हाताने व लाथाबुक्यानी मारण्यास सुरवात केली त्यावेळी मुलगा खालीद हा त्याचे मोबाइलमध्ये भांडणाचे शुटिंग करत होता.
त्यावेळी आरबाज सलावुददीन शेख याने त्याचे हातातुन मोबाइल फोन हिसकावून घेवुन आमीर नुरूददीन शेख याचे हातात दिला तेव्हा मुलगा खालीद हा फिर्यादीस सोडण्यासाठी आला असता साजीद शेख, आमीर शेख, अरबाज शेख व त्याचे बरोबरचे नुरूददीन शेख, सागीर शेख, आबीद शेख तंजीम शेख यांनी मुलगा खालीद यास लाथाबुक्यांनी मारहाण लोखंडी अँगलने खालीद यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने डोक्यात मारहाण केली.
तसेच फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मनी हे ओढून घेतले त्यावेळी पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष हे मध्ये भांडणे सोडविण्यासाठी आले असता वरील सर्वांनी त्यांना धमकी देवुन बाजुला काढले.
याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन येथे वरील सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपासायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.
विविध कारणांसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आता नकोत्या गोष्टींनी चर्चेत आहे. या शिवाय बाहेरच्या लोकांच्या येण्यामुळे मुळ पुणेकराला होणार त्रास हे शहर सगळ्यांनीच विचार केला पाहिजे !!