सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. मात्र नार्वेकर यांच्या निवडीवरून विरोधकांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीये. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर आणि ओम बिर्ला यांच्यावर जोरदार टीका केली.

पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. शिवसेनेवरील निकालावरून राहुल नार्वेकर आधीच ट्रोल झाले होते अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, ऍड. अमोल मातेले यांनी देखील राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय आहे ऍड. अमोल मातेले यांची पोस्ट ?

स्वतः तीन पक्ष बदलणारे आज पक्षांतर कायदा चिकित्सक समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ज्या विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान ठेवता आला नाही ते आता इथेही गौडबंगालच करतील. थोडक्यात काय बोगस वागावं अन् तेही रेटून वागावं!


राहुल नार्वेकर यांचा फोटो पोस्ट करत त्यांनी हे ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

https://twitter.com/AdvAmolMatele/status/1751893804297388183?t=OyBdAPFt_jb0SA7l6g_u2w&s=08