kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘ऑपरेशन सिंदूर’ : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. हे हल्ले पहाटे १.३० च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. पहलगामवरील हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताकडून कडक पाऊले उचलण्यात आली. या हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. संपूर्ण देशातून लष्कराचे काैतुक केले जात आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व भारतीयांकरिता हा दिवस अभिमानाचा आहे. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल आणि तो आज आपण घेतलेला आहे.

विशेतत: ऑपरेशन सिंदूर हे नाव मला वाटते की, अधिक बोलके आहे. भारतीय सैन्याचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करू. एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी हे उद्ध्वस्त करतानाचे पूर्ण शूटिंग करण्यात आल्याने कोणाला काही बोलण्यास जागा उरलेली नाहीये. यावेळी भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत.

सकाळपासूनच भारतीय सैन्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. या हल्ल्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अमित शहा यांनी देखील या ऑपरेशन सिंधूरनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनीही भारतीय सैन्याचे काैतुक करण्याची पोस्ट शेअर केली. ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कर अलर्ट मोडवर आहे. अशा बदलत्या घडामोडींमध्ये, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांची बैठक बोलावली आहे. सुरक्षेची पुर्णपणे काळजी हे घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *