अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी सरकारने यापूर्वी केलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींची तरतूद केली आहे याची माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी त्यांनी दिलासादायक घोषणा केल्या आहेत.
भारतामध्ये ई-व्हेईकल इकोसिस्टीम वाढवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी भारतातच या वाहनांचं उत्पादन घेण्यास चालना देणे आणि मोठं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे याकडे सरकार लक्ष देणार आहे. सोबतच सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ई-बसेसचं जाळं निर्माण करण्याचीही सीतारामन यांनी घोषणा केली. या नेटवर्कला पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझमच्या मदतीने चालना देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी उत्पादन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला असला; तरी वाहनांच्या सबसिडीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांवरील सबसिडी वाढणार अशी सर्वसामान्यांची आशा लोप पावली आहे.