kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. नुकतीच ती चर्चेत आली आहे तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे !कार्तिकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. ‘माझ्या हातात इतके कोणाचेही बोट योग्य पद्धतीने मावणार नाही आणि मला हे खूप छान वाटत आहे. माझ्या लहान मुलाचा हात हातात घेताना मला आनंद होत आहे’, अशी पोस्ट कार्तिकीने केली आहे. चाहत्यांनी कार्तिकीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी कार्तिकीच्या डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा पासूनच या नव्या पाहुण्याच्या आगमनाची सर्वजण वाट पाहात होते. आता अखेर कार्तिकी आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमाने कार्तिकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. तिने सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत. २०२० साली तिने रोनित पिसेशी लग्न केले. त्यानंतर आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आले होते. आता कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.