Breaking News

नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! अनेकजण जणांचा मृत्यू

गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी दिली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असेही त्यांनी सांगितले.

बसमधील ४८ भविकांना घेऊन बस नाशिकत्या त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, यादरम्यान हा अपघात झाला. दरम्यान बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *