kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोदींना मत म्हणजे विनाशाला मत – उद्धव ठाकरे

अबकी बार भाजप तडीपार होणार आहे. हुकूमशहांना देशातून तडीपार करुन टाका.हे लोक काजू, आंबा,कांद्यावर निर्यातबंदी लावतात. आता हि निर्यातबंदी उठविण्यासाठी भाजपलाच निर्यात करून टाका. जाऊ दे थेट साता समुद्रापार,देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागले आहेत. पण मी सांगतो मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. त्यामुळे जनतेने जागरूक राहून मतदान करा अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी थापाड्या भाजप आणि मोदी सरकारवर हल्ला चढवला.

    कोकणात शिवसेनेचे तुफान आले असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया -महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.  विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची खणखणीत सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती.याप्रसंगी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही सभेला उपस्थिती दर्शविली होती.