kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता अंकित मोहनला गंभीर दुखापत

लवकरच ‘बाबू’ हा एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अंकित मोहन आणि रुचिरा जाधव महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशन दरम्यान अभिनेता अंकित मोहनला दुखापत झाली आहे.

‘बाबू’ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील दिवाळे गावातील मासे मार्केटमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. यावेळी चित्रपटातील टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशातही तो नाचत होता, परंतु हातातून रक्त वाहू लागल्याने सगळे कोळी बांधव लगेच त्याच्या मदतीला धावून आले. गंभीर दुखापत असल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. अंकितच्या हाताला नऊ टाके पडले आहेत.

‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दुखापत झाल्यानंतर अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर अंकित आपल्या कोळी बांधवाना भेटण्यास आणि त्यांचे आभार मानण्यास पुन्हा त्या मार्केटमध्ये गेला. या सगळ्यांचे प्रेम बघून अंकित भारावून गेला.

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.