kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेते सुमेध मुदगलकर यांचा शुटींगदरम्यान अपघात, शस्त्रक्रियाही झाली; पोस्ट चर्चेत !

छोट्या पडद्यावरील राधा-कृष्ण या मालिकेत श्री कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते सुमेध मुदगलकर यांना शुटींगदरम्यान गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला इजा झाली आहे. सुमेध यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. सुमेध यांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे झालेल्या दुखापतीविषयीही सांगितलं. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकरच बरे होण्यासाठी त्याचप्रमाणे काळजी घेण्याचाही सल्ला दिलाय.

सुमेध मुदगलकर यांची पोस्ट नेमकी काय?

एक अॅक्शन सीनचं शुटींग करत असताना दुर्दैवाने माझ्या नाकाच्या हाडाला दुखापत झाली. नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे मला त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण आता सगळं ठिक आहे. मी अगदी व्यवस्थित आहे. तसेच काळजी करण्याचं काहीही कारण ही. ही फार मोठी दुखापत नव्हती. दुखापत भरुन निघण्यासाठी काही दिवस जातील.

सुमेध हे श्री कृष्णाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनीही अगदी भरभरुन प्रेम केलं.