kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल ; उपचार सुरू

जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचा अनंतच्या लग्नातील खास डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला काही दिवसांपासून डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सध्या जान्हवी कपूर ही तिच्या आगामी उलझ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

जान्हवी कपूर ही सतत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आणि प्रमोशनमध्ये दिसत आहे. हेच नाहीतर आता अनंत अंबानीच्या लग्नातील प्रत्येक फंक्शनमध्येही जान्हवी कपूर ही उपस्थित होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशनही तिने सुरू केले. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत.

आता तब्येत खराब असल्याने जान्हवी कपूर हिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या जान्हवी कपूर हिच्यावर उपचार सुरू आहेत. रिपोर्टनुसार कालच जान्हवी कपूर हिची तब्येत खराब झाली. मात्र, तिने आराम करण्याचा निर्णय घेतला. आज तब्येत अधिकच खराब झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

जान्हवी कपूर हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले की, जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झालीये. तिची तब्येत अधिकच बिघडत असल्याने तिला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या जान्हवी कपूरवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आता जान्हवी कपूर आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यापासून जान्हवी कपूर हिची तब्येत नेमकी कशी आहे, याबद्दल अजून काही माहिती ही मिळू शकली नाहीये. चाहते हे आता जान्हवी कपूर हिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना देखील दिसत आहेत. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही जान्हवी कपूर ही कायम दिसते.