इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक नेपोचा परफॉर्मन्स पाहून अनुराग बसूला गायक स्व. केके ची आठवण आली आणि त्याने मायकल जॅक्सनशी अचानक झालेल्या भेटीचा किस्साही सांगितला
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 तुमच्या वीकएंडला मस्त फिल्मी तडका देणार आहे. या वीकएंडचे एपिसोड्स प्रेक्षकांना आठवणींच्या दुनियेत घेऊन जातील कारण यावेळी थीम आहे, ‘ईराज ऑफ बॉलीवुड’. वेगवेगळ्या दशकात बॉलीवूडची स्टाइल कशी बदलत गेली हे आपल्या परफॉर्मन्समधून दाखवून स्पर्धक हिंदी सिनेमाला आदरांजली वाहतील. ENT स्पेशलिस्ट करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस सोबत या वीकएंडला सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू असणार आहे. थेट कृष्ण-धवल युगापासून ते 90च्या दशकाचे लोकप्रिय युग आणि आता मिलेनियमचे जोशपूर्ण युग असा बॉलीवूडचा प्रवास आपल्या डान्समधून दाखवून विविध डान्स शैली, संगीत आणि कोरिओग्राफीचे दर्शन आपले स्पर्धक प्रेक्षकांना घडवतील.
उत्तराखंडहून आलेला नेपो आणि त्याची कोरिओग्राफर वर्तिका झा मिळून तडफदार, जोशपूर्ण मिलेनियम मंचावर जिवंत करतील. हे दोघे मिळून ‘काइट्स’ चित्रपटातील ‘दिल क्युं ये मेरा’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसतील. भारतीय सिनेमाच्या या जबरदस्त दशकाची झलक त्यांच्या डान्समधून बघायला मिळेल. ज्याने काइट्स चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तो अनुराग बसू हा अॅक्ट पाहून चकितच झाला. तो म्हणाला, “सुंदर! मी थोडे मागे जाऊन या गाण्याचे शूटिंग पुन्हा करू का? (हसतो). खूपच छान, सुंदर, डौलदार आणि अद्भुत! वर्तिका आणि नेपो तुम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहात आणि तुम्ही कमाल केलीत. वर्तिकाची बरोबरी करणे फार कठीण आहे, पण नेपो, तू खूप डौलदार डान्सर आहेस, हळुवार आणि खूप सुंदर!”
नंतर जेव्हा गीता कपूरने अनुराग बसूला या गाण्याच्या चित्रीकरणामागची विचार प्रक्रिया विचारली, तेव्हा तो म्हणाला, “आम्ही LA मधल्या एका भव्य हवेलीत या गाण्याचे चित्रीकरण करत होतो. तिथल्या एका खूप मोठ्या बेडरूमचा आम्ही मेकअप रूम म्हणून उपयोग करत होतो. अचानक कुणी तरी येऊन सांगितले की, आम्हाला ती खोली तातडीने रिकामी करावी लागेल, कारण मायकल जॅक्सन ती प्रॉपर्टी बघायला येणार होता, कारण त्याला ती भाड्याने घ्यायची होती. सुरुवातीला आम्ही हे फारसे गंभीरपणे घेतले नाही. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, तो येणार नाहीये; कुणी तरी दुसरा माणूस, एक रियल इस्टेट एजंट येणार आहे. त्यामुळे आम्ही शूटिंग चालू ठेवले. पण नंतर मायकल जॅक्सन खरोखरच आला. आम्ही शूटिंग करत होतो आणि त्याची कार आली. त्यावेळी तुम्ही डुग्गूला बघायला हवं होतं- तो मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे. तो तर वेडाच झाला! त्याला मायकल जॅक्सनसोबत फोटो काढायचा होता. ही खरोखरच आश्चर्याची बाब होती की, आम्ही शूटिंग करत असतानाच नेमका तिकडे मायकल जॅक्सन आला. डुग्गू आणि मी तर स्तब्धच झालो, आम्हाला शब्दच सुचेनात. या चित्रपटाशी निगडीत अशा काही खूप गोड आठवणी आहेत.”
तो अॅक्ट बघताना अनुराग बसूला पार्श्वगायक स्व. केकेची आठवण आली. तो म्हणाला, “हा अॅक्ट जेव्हा सुरू झाला, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला, तो केकेचा. मला त्याची फार आठवण येते. माझी काही चांगली गाणी त्याने म्हटली आहेत- मग ती ‘गँगस्टर: अ लव्ह स्टोरी’ चित्रपटाची असो किंवा ‘लाइफ इन अ मेट्रो’ची असो. केकेने मला अशी काही अद्भुत गाणी दिली आहेत. हे गाणे त्यापैकीच एक आहे. दुर्दैवाने तो आता आपल्यात नाही.”
या वीकएंडला बघायला विसरू नका, ‘ईराज ऑफ बॉलीवुड’ इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये, रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!