अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. एका पांढऱ्या कॉफी मगचा फोटो तिने शेअर केला आहे. ज्यावर ‘ड्रीमर’ असे लिहिलं आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये एक पोल जोडला आहे. “तुमचा कप तुम्हाला सगळं काही सांगू शकतो का?” त्यावर उत्तर देत तिने म्हटलं की, “हो! माझाही सांगतो” आणि “नाही, विचित्र बनू नका”
आलिया सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्याच्या अपडेट देत असते. नुकतीच नवीन वर्षानिमित्त फिरायला गेली.वर्षाच्या सुरुवातीला, अभिनेत्रीने तिच्या टूरमधील कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.