राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून केंद्रीय बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबी) तसेच व्यावसायिक शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज वंदन बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.
अॅड. मातेले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, भारतीय राष्ट्रध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचा व एकतेचा प्रतीक असून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि कर्तव्यभावनेची जागृती करण्यासाठी तिरंग्याचा आदर अनिवार्य केला पाहिजे. सध्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमावर आधारित काही शाळांमध्ये राष्ट्रध्वज वंदनाला अपेक्षित महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे या शाळांमध्ये राष्ट्रध्वज वंदन बंधनकारक करणे ही काळाची गरज आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
१. राष्ट्रीय सन्मानाचे दिवस: प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), महाराष्ट्र दिन (१ मे) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) या दिवशी सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज वंदन सक्तीने करण्यात यावे.
विद्यार्थ्यांवरील परिणाम: तिरंग्याचा आदर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान, एकात्मता आणि देशभक्तीची भावना निर्माण करतो.
ध्वज संहितेचे पालन: भारतीय ध्वज संहितेनुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार आहे.
केंद्रीय शाळांचा समावेश: सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि व्यावसायिक शाळांमध्ये देखील राष्ट्रध्वज वंदन सक्तीने करावे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मागणी महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज वंदन अनिवार्य करावे. विशेषतः केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये याची सक्तीने अंमलबजावणी करावी.
अॅड. मातेले यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.