kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात होणार ; अजितदादांचा वादा

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहि‍णींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपूर्ती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. मात्र, त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत,असे आवाहन या राज्यकर्त्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहि‍णींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच, महिन्याला 1500 रुपये जमा होण्याची वाट पाहतात. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता 3000 रुपये जमा केला होता. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा हफ्तादेखील 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता, दिवाळीच्या भाऊबीजलेही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्या त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली?. मात्र, माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे चालण्यासाठी घड्याळा चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वाद आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे, असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणाच माजलगाव येथील सभेतून अजित पवारांनी केली.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मतदार संघात काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी कमळ, काही ठिकाणी बाण असे चिन्ह असेल. राज्यात आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजाला देणार आहे. लोकसभेला आम्ही कमी पडलो, बीडची जागा सहा सात हजाराने गेली, आम्हाला वाईट वाटले, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अजित पवारांनी बोलून दाखवली. तसेच, मराठवाड्यात बीड आणि परभणीला विमानतळ नाही. या दोन जिल्ह्यात विमान उतरेल अशी जमीन पाहा, असे म्हणत अजित पवार यांच्याकडून दोन्ही जिल्ह्याला विमानतळ देण्याची घोषणा करण्यात आलीय. तसेच, माजलगावमध्ये तुमच्या मनात जो उमेदवार आहे, त्या उमेदवाराला मी उमेदवारी देईल हा शब्द देतो, असेही अजित पवार म्हणाले.