kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली.

बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,पुर्व विदर्भ महिला संघटिका शिल्पाताई बोडखे,जिल्हासंपर्क प्रमुख प्रदीप खोपडे , युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे ,विधान सभा संपर्क प्रमुख मनोज कपोते,सहसंपर्क प्रमुख नरेश डाहारे,जिल्हाप्रमुख संजय भाऊ रेहपाडे,अँड रविभाऊ वाढई, महिला आघाडी जिल्हा संघटिका रश्मीताई पातुरकर, युवासेना विस्तारक विक्रम राठोड ,युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, जितु उइके,गोंदिया जिल्हासंपर्क प्रमुख बाबा ठाकुर,नरेश माळवे होते.

 भंडारा शहरात शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांचे शासकीय आय.टी. आय. टाकळी येथे आगमन होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून शेकडो मोटारसायकलची  रॅली काढण्यात आली .यावेळी बैठकीला जिल्ह्य़ातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह  उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख ,शाखाप्रमुख, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.