Breaking News

मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर 74 कोटीच्या घोटाळ्याच गंभीर आरोप

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता काही तास उरले असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मेट्रोच्या कामावरुन एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे, सोबत इशारा सुद्धा दिलाय. “मिंधेंच्या गँगमध्ये आमचे एक-दोने जुने ओळखीचे लोक आहेत, त्यांना तिकीटं मिळालेली नाहीत ते सांगतात आम्हाला” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, तो घोटाळा महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील नगरविकास खात्याने हा घोटाळा केलाय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“मुंबईत मेट्रोच काम पूर्ण होण्याआधीच रंगरंगोटीच्या कामातून घोटाळा केला जातोय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “मुंबई MMRDA क्षेत्रात मेट्रोची काम सुरु आहेत. अनेक कामं पूर्ण झालेली नाहीत. मेट्रोचे जे खांब आहेत, त्यांना काम पूर्ण होण्याआधीच गर्डर लागण्याआधीच रंगवून टाकलय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

“या खांबांना गर्डर लागल्यानंतर पुन्हा नुकसान, मग पुन्हा रंगवायचं. रंग कुठले वापरले आहेत? तुम्ही तुमचं घर बनवताना, भिंत बनवताना अर्धवट कामावर रंगरंगोटी करता का? अर्धवट कामावर रंगरंगोटी करण्यासाठी 74 कोटी 41 लाख 92 हजार 179 रुपये उडवण्यात आले आहेत. यांच्याकडे बीएसटीला, ग्रॅज्युईटीला, दिवाळी बोनस, पोलिसांच्या घरासाठी, कापूस, सोयाबीनसाठी पैसे नाहीत. पण असे खर्च करण्यासाठी 74 कोटी आहेत. हा घोटाळा नाही, तर काय?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

“आमचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर या सर्व घोटाळ्यांची चौकशी करुन दो दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. हे सामान्य जनतेचे पैसे आहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा पैसा जातोय” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलसा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *