Breaking News

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या पाडवी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जोरात तयारी सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना कल्याणमध्ये झटका दिला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांना नंदुरबार जिल्ह्यातही धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात होते.