Breaking News

मोठी बातमी ! पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम या भागात एका प्रवासी व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी व्हॅनवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक ९ वर्षांच्या मुलीसह काही महिलांचाही समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमधील काही नागरिकांना एक प्रवासी वाहन घेऊन जात असताना अचानक दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात दाधुंद गोळीबार केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामधील काहींही प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांत या प्रदेशात झालेल्या हल्ल्यापैकी हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. दरम्यान, या घटनेसंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत झालेल्या हल्ल्यापैकी हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ लष्कराने घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरु केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या घटनेनंतर खैबर पख्तुनख्वामधील नेते अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याचा (Terrorist Attack) निषेध केला आहे. तसेच प्रशासनाकडून प्रांतातील सर्व रस्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रांतीय महामार्ग पोलीस युनिट स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *