Breaking News

मोठी बातमी ! बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी याच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली. सोशल मीडियावर पोस्ट करत ही जबाबदारी या गँगने घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर काल गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्यांची हत्या झाली. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे.

बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जो दाऊदला मदत करणार, त्याचा हिशोब आम्ही करणार’, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हिंदी भाषेत ही पोस्ट लिहिली असून यामध्ये सलमान खानचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण दाऊदला बॉलिवूड, राजकारण आणि प्रॉपर्टी डिलींगशी जोडणे असे होते. आम्ही कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. असा इशाराही यातून देण्यात आला आहे.