Breaking News

मोठी बातमी ! CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका

१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली.याच मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१ डिसेंबर रोजी अभिनेते दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल केलं आहे. प्रकृती गंभीर असल्यामुळे सध्या दिनेश व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देत आहेत. संपूर्ण सीआयडी मालिकेच्या टीमला दिनेश यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे मालिकेतील सर्व कलाकार रुग्णालयात सतत दिनेश यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत आहेत. माहितीनुसार, १ डिसेंबरला दिनेश यांची प्रकृती गंभीर होती, पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतं आहेत.

दिनेश फडणीस यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९९८ पासून ते २०१८ पर्यंत त्यांनी ‘सीआयडी’ मालिकेत फ्रेडरिक्सचं पात्र निभावलं होतं. त्यांनी साकारलेला फ्रेडरिक्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. याशिवाय दिनेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये छोटी भूमिका निभावली होती. याशिवाय काही चित्रपटांमध्ये त्यांनी कॅमिओ केला आहे.