हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजप हरियाणात तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतो.

शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणातील परिस्थिती भाजपासाठी चांगली नाही असे म्हंटले जात असताना आता हाती आलेले कल हे विधान खोडताना दिसून येत आहे. पण या मुद्द्यांमुळे भाजपला फायदा नाही असं म्हणत असताना अशी परिस्थिती नेमकी का बदलली ? याची चर्चा होत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 8 ऑक्टोबररोजी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी चुरशीची ठरली. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली असल्याचे म्हंटल जात आहे. एकीकडे भाजपचे दिग्गज नेते रॅलीत दिसत होते, तर दुसरीकडे आरएसएस तळागाळात काम करत होती. त्यामुळे या निवडणुकीत आरएसएसची भूमिका महत्वाची मनाली जात आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत आरएसएसने आपली पूर्ण ताकद लावली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे सर्व दिग्गज रॅली काढून जनतेला संबोधित करत असताना, दुसरीकडे आरएसएस तळागाळात काम करत मतदारांना आपल्याकडे वळवले आहे. गेल्या चार महिन्यांत आरएसएसने हरियाणात 16 हजार छोट्या सभा घेतल्या. विशेष म्हणजे यात त्यांनी गैर-जाट मतदारांना जिंकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. असं म्हणण्यात येत आहे. तसेच

आरएसएसच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामांचा हाच फायदा भाजपाला होत आहे का ? असा प्रश्न आता राजकीय आणि सामाजिक स्तरात चर्चिला जात आहे.
मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरणार आहे. हरियाणातील अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. हरियाणातील काँग्रेसचा पक्षातंर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला का, हे आता पाहावे लागेल. भाजपला यंदाच्या निवडणुकीत हरियाणात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपला हरियाणात इतक्या मोठ्याप्रमाणावर यश मिळाले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *