Breaking News

बजेट २०२५ : १२ लाखांपर्यंत आयकर नाही ; आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार ०३ चा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा, १९६१ ची जागा घेईल. आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.

किती बदलला टॅक्स ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली आहे. त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत ५० हजार रुपयांवरून ०१ लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच, टीडीएस-टीसीएस कमी होणार आहे.

२०२० च्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली, तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितले की, आयकर दात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण आता देशातील ६५ टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. म्हणजेच प्रत्येक ३ पैकी २ लोक नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर भरत आहेत. गेल्या एका वर्षात या डेटामध्ये बरेच बदल झाले आहेत.

बदलानंतर नवीन कर व्यवस्था अशी होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *