आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांनी भेट घेऊन मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सविस्तर चर्चा केली. या घटनांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक शांतता आणि सलोखा धोक्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची प्रतिक्रिया श्री. कदम यांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी या दुर्दैवी घटनांमध्ये संबंधित प्रशासनाला कठोर पावले उचलण्यास व न्यायप्रक्रिया तातडीने गतिमान करण्याचे आदेश देण्याचा निर्धार व्यक्त केला.
जनआक्रोश मोर्चा :
२५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता या घटनांवर निषेध व्यक्त करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान, मुंबई दरम्यान व्यापक जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मोर्चामध्ये सहभागी होणारे घटक:
सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक समुदायाचे नागरिक