राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांपूर्वीच तासाभरापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

सप्टेंबर महिन्यात समीर खान यांचा कुर्ल्यात कार अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. जेव्हा ते कारमध्ये बसत होते तेव्हा कार चालकानं चुकून एक्सलेटर दाबला त्यानंतर कार एका भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *