kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’

बॉलीवुड अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. सलनान खानला धमकी देणारे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे समोर आले. त्यानंतर आणखी एका बॉलीवुड अभिनेत्यास धमकी आली आहे. हा अभिनेता किंग खान म्हणून ओळखला जातो. किंग खान म्हणजेच आता शाहरुख खानला धमक्या मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता शाहरुखचे कोणतेही चाहते मन्नतच्या जवळ येऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात फोन केला. त्याने म्हटले की, शाहरुख याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला ठार करीन, असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलते ठेवले. त्याचे नाव काय आहे, असे विचारले. मात्र तो व्यक्ती अधिकच हुशार निघाला. शाहरुखला धमकीचे कॉल कॉलर म्हणाला, मी कोण आहे हे तो सांगत नाही, तुला लिहायचे असेल तर माझे नाव ‘हिंदुस्थानी’ लिहा. वांद्रे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा एफआयआर दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. बाबा सिद्दिकी यांनी सलमान खानला मदत केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले. या प्रकरणानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहरुख यालाही धमकीचा फोन आला आहे. आता या धमकीमागे कोण आहे? हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.