राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर जाहीर झाला आहे. रविवारी (16 डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं गृह खातं स्वत:कडं ठेवलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही होते. शिंदे यांना गृह खातं मिळालं नसलं तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती स्वत:ला मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक महानगर आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा राज्यातील महानगरांची संख्या अधिक आहे. त्याचं महत्त्व मोठं आहे. या महानगरांशी संबंधित नगरविकास खात्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. नगरविकास खात्याचं महत्त्व लक्षात घेता हे खातं मुख्यमंत्री स्वत:कडं ठेवण्याचा प्रघात राज्यात अनेक वर्ष होता. अगदी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी हे खातं स्वत:कडं ठेवलं होतं.

आता भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. भाजपा आमदारांची संख्याही शिवसेनेपेक्षा दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यावेळी शिंदे यांना नगरविकास खातं मिळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिंदे हे खातं स्वत:कडं राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
नगरविकासप्रमाणेच गृहनिर्माण हे आणखी एक शक्तीशाली मंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. यापूर्वी भाजपाचे नेते अतुल सावे गृहनिर्माण मंत्री होते. भाजपाकडील हे खातं आपल्याकडे खेचण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळात शिंदेसह उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, शंभूराज देसाई, संजय शिरसाट प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि प्रकाश आबिटर हे कॅबिनेट मंत्री आहेत. तर आशिष जैस्वाल आणि योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडं कोणती खाती?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
गुलाबराव पाटील – जलपुरवठा आणि स्वच्छता
दादा भुसे – शालेय शिक्षण
संजय राठोड – मृदा आणि पाणी संवर्धन
उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – परिवहन
भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
शिवसेनेचे राज्यमंत्री
आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्नसन, कायदा आणि सूव्यवस्था, कामगार
योगेश कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न आणि नागरीपुरवठा