kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नेपाळीने मोदी की सौगातच स्वगात केलय का? – संजय राऊत

“मोदी की सौगात जाहीर झाल्यावर हे मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले फालतु, नकली हिंदुत्ववादी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. हे जे नेपाळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. ज्यांना या देशात मुस्लिमांच अस्तित्वच मान्यच नाही, मुस्लिमांनी राहूच नये किंवा मुस्लिम शत्रूच आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडे जे लोक या देशातलं वातावरण खराब करत आहेत. त्यांनी मोदी की सौगातच स्वगात केलय का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “आम्ही स्वागत करतो, या देशातील गरीब मुस्लिमांना मोदींनी हात पुढे केलेला आहे, ही सरकारची मदत आहे. आम्ही त्यावर टीका करणार नाही. पण कालपर्यंत जे ईद, इफ्तारवर टीका करत होते, त्यांची प्रतिक्रिया का आली नाही? बाडग्या हिंदुंची या निर्णयामुळे गोची झाली आहे. त्यांना बहुधा मोदी आता इफ्तार पार्टीत सुद्धा पाठवतील” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

“शिंदे काय म्हणतात, त्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. ते जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते? हे त्यांनी सांगावं. कामराने प्रत्येकावर व्यंग केल आहे. सुपारी आहे, मग आमच्यावर टीका झाली त्यावेळी तुम्ही सुपारी दिली होती का? कुणीही समाज तोडत नाही, राजकारणात टीकेचे घाव सोसले पाहिजेत” असं संजय राऊत एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणाले. “विरोधी पक्ष नेता नाही ही स्वातंत्र्याची गळचेपी आहे. नेमणूक का केली जात नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“सीएम, गोरे प्रकरणात चोराला पाठीशी घालतात. मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेतलं ही भूमिका चुकीची आहे” असं संजय राऊत म्हणाले. “मुंबईला पाकिस्तान म्हटलं तर ते चालेल का, हा भारत देश आहे कोणत्याही भागाला पाकिस्तान, बांगलादेश म्हणू शकत नाही. व्यंगचित्र काय होतं हे पाहून या” असं संजय राऊत म्हणाले. “एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती डोकी नाहीत मडकी आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम भाजपने केलं आहे. त्याचे शिरोमणी मिस्टर अमित शाह आहेत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्याबाबत राज्य सरकारने आपलं मत व्यक्त करावं” असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *