सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस सीझन 5ची स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत अंकिता लग्नगाठ बांधत आहे. ग्रामदेवतेसमोर लग्नाची पत्रिका ठेवल्याच्या क्षणापासून अंकिता आणि कुणाल त्यांच्या लग्नसोहळ्याबाबतचे प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लग्नाचे शॉपिंग, चाहत्यांकडून मिळालेल्या गिफ्ट्सपासून ते स्वतःचे सामान नवऱ्याच्या घरी शिफ्ट करेपर्यंतच्या सर्व गोष्टी अंकिता-कुणाल आपल्या फॉलोअर्ससह शेअर करत आहेत.
13 फेब्रुवारी रोजी अंकिताचा मेंदी सोहळा पार पडला. अंकिता-कुणालच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने मेंदी सोहळ्यामध्ये किती धमाल केली, हे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यानंतर कुणाल-अंकिताने आणखी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. “लवकरच घेऊन येतोय एक कमाल गाणं कोकणची परी”, असे कॅप्शनही त्यांनी व्हिडीओ दिलंय. एकूणच कुणालने होणाऱ्या पत्नीसाठी कविता, शायरी नव्हे तर थेट गाणंच चित्रित केले आहे. कुणालनं गाण्याबाबत थोडक्यात माहिती देखील शेअर केलीय.
गाण्याबाबत कुणाल म्हणालाय की, “मी लहानपणापासून एक स्वप्न बघितलंय म्हणजे आपल्याला परीची गोष्ट सांगतात की अशी अशी एक परी होती आणि एवढे वर्ष ती फक्त पाठमोऱ्हीच होती आज ती टर्न करणार आहे…कोकणपरीच घेऊन येतोय”.
कुणाल आणि अंकिताच्या या पोस्टवर युजर्संनी लाइक-कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आला आहे.
यापूर्वी अंकिता-कुणालने आगळावेगळा प्री वेडिंग व्हिडीओ शेअर केला होता. “सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण लग्नं टिकलीच ना? आतापेक्षा तरी जास्तच…सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरच आपल्याला समाजात स्थान मिळेल असं नाही…आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्या व्यक्तीसोबतच photoshoot म्हणजे प्रीवेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करणं आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे……मी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटल माझं प्री वेडिंग????” असे मनाले भिडणारे कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले होते.