Breaking News

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अत्यंत खुमासदार पाककृती कार्यक्रम पाहण्यासाठी सज्ज व्हा. मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, असे वचन देतो. हा कार्यक्रम आता सेलिब्रेटी मास्टरशेफ- अब उन सबकी सिटी बजेगी.. या नावाने परत येत आहे.


विविध खाद्यपदार्थांची आवड असलेल्या आणि मनोरंजन करणाऱ्या फराह खान या सदर सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात सूत्रसंचालन करतील. संबंधित पदार्थांच्या कहाण्या तससेच त्यासंबंधीचे किस्से त्या या कार्यक्रमात सांगतील. रोखठोक आणि अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध असलेल्या फराह खान या आपल्या किचनमधील सर्वात कठीण टीकाकार असतील. समोर सेलिब्रेटी असले तरीही त्या शब्दांमध्ये भेदभाव करत नाहीत. धारदार प्रतिक्रिया आणि वन लायनर्स याद्वारे त्या स्पर्धकांना जमिनीवर ठेवतात तसेच प्रत्येक डिश तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतील.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना फराह खान म्हणाल्या, “मी खाद्यपदार्थांची शौकिन आहे. पाककृतींचे प्रयोग करणे, नवे पदार्थ चाखून पाहणे, त्यात माझे काही बदल करणे मला आवडते. माझे स्वत:चे डिजिटल चॅनेल तयार करून मी माझे खाद्यपदार्थाबद्दलचे प्रेम प्रवाही केले आहे. मी सेलिब्रेटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती सोडली नाही. या कार्यक्रमाचे स्वरुप मला खूप आवडते. तसेच या स्पर्धेतले उत्कृष्ट शेफ जज, प्रतिभाशाली रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांच्याशी मैत्री झाल्याने मला आनंद झाला. मास्टरशेफचा परिवार पहिल्यांदा भारतात आला तेव्हा मी त्याचा एक भाग होते आणि आता सध्याच्या भागात सहभागी असलेले सगळेच अविश्वसनीय सेलिब्रेटी माझ्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यामुळे आता आम्ही कार्यक्रमात चांगलाच धुडगूस घालणार आहोत. सूत्रसंचालक या नात्याने मी मास्टरशेफच्या किचनमध्ये मेजनानी देण्यासाठी मी उत्सुक आहे. रोखठोक, आरपार प्रामाणिक प्रतिक्रियांचीच इथे अपेक्षा करा.. कारण ‘सेलिब्रेटी मास्टरशेफमध्ये फराह खान शिट्टी वाजवणार…’ प्रेशर सुरु झाले आहे.. फक्त उत्कृष्ट कलाकारच चमकणार..’’

प्रोमो इथे पहा- (लिंक)
चॅनेलने सेलिब्रेटी स्पर्धकांची रांगच लावली आहे. हे सेलिब्रेटी आता त्यांच्या कुकिंग कौशल्याची परीक्षा देण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत.

सेलिब्रेटिंची प्रतिष्ठा पणाला लागेल, आपल्या आवडते चेहरे त्यांच्या पटकथेत आणि अभिनयातून चॉप्स आणि अपरॉन शोधतील, व्हिस्कसाठी धावपळ करतील.. किचनमध्ये असल्याने ते आता स्वादिष्ट पदार्थ तयार करतील आणि आव्हानांना सामोरे जातील.
सेलिब्रेटींच्या यादीत कोण सहभागी होईल आणि सेलिब्रेटी मास्टरशेफच्या प्रतिष्ठित किताबावर कोण दावा ठोकणार…तुम्हाला काय वाटतं?


सेलिब्रेटी मास्टरशेफ लवकरच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरु होणार…