भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’असा उल्लेख केलाय. बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीये. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री व संघर्ष कन्या असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे 29 तारखेला जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. भगवान भक्ती गडावरून त्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. यावर्षी भाजप आमदार पंकजा मुंडे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर समर्थकांच्या आत्महत्याने व्यथित असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पंकजा मुंडे यांचा 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी हा वाढदिवस साजरा न करण्याचं पंकजा मुंडे यांनी ठरवलं आहे. आपल्या प्रेमरूपी एका एसएमएसवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रदान द्यावेत असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलंय. तर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे 29 तारखेला बीड जिल्ह्यात दाखल होणार आहेत. भगवानभक्ती गडावरून पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल.