kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मला राग येतो,नेहमी पुरुषांनाच का दोष दिला जातो; घटस्फोटाच्या चर्चा अन् अभिषेकचे मुलाखतीमधील वक्तव्य व्हायरल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रोज होताना दिसतायत. पण सुरुवातीपासूनच अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये चाहत्यांनी ऐश्वर्यालाच पाठिंबा दर्शवला आहे. अभिषेक आणि बच्चन कुटुंबाला चाहत्यांनी या प्रकरणावरून ट्रोल केलेलं पाहायला मिळतं आहे. या सर्वांमध्ये भर पडली ती ऐश्वर्याच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबातील एकानेही शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यातच ऐश्वर्याने मात्र काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या देऊन सुद्धा बच्चन कुटुंबाने विशेषत: अभिषेकने दुर्लक्ष केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना जसे अमिताभ यांचे एक जुने ट्वीट व्हायरल झाले तसेच आता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने पुरुषांबाबत केलेलं वक्तव्य व्हायरलं होतं आहे.

सिमी ग्रेवालने तिच्या कार्यक्रमाची एक जुनी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक नातेसंबंधांमधील बांधिलकी आणि विश्वास यावर भाष्य करताना दिसत आहे. सध्या बच्चन कुटुंबाविषयी सुरु असलेल्या चर्चांदरम्यान त्यांची बाजू सावरण्यासाठी सिमीने या हा व्हिडीओ शेअर केल्याचं म्हटलं जातंय.

सिमी ग्रेवालने शेअर केलेली क्लिप तिचा कार्यक्रम “Rendezvous with Simi Garewal” मधील आहे. या कार्यक्रमात 2003 मध्ये अभिषेक बच्चने सहभाग नोंदवला होता. त्याने म्हटलं होतं की, “मला जुन्या पद्धतीचं पण साधं सरळं राहणीमानात जगण्यास काहीही अडचण नाही. मज्जा करायची इच्छा असलेल्या लोकांशीही मला काहीही अडचण नाही. त्यांनी नक्कीच त्यांना हव्या गोष्टींचा आनंद घ्यावा… पण जर तुम्ही कोणत्याही स्तरावर वचनबद्धता केली असेल तर त्या वचनबद्धतेचे पालन करा, अन्यथा, ते करू नका.

तसेत तो पुढे म्हणाला “मला एक पुरुष म्हणून असं वाटतं की, जर तुम्ही एखाद्या स्त्रीसोबत वचनबद्ध असाल आणि जरी पुढे कधी तिच्या प्रियकरासोबत सामना झाला तरी तुमचा तिच्यावर विश्वास असायला हवा. कारण पुरुषांवर कायमच धोकेबाज असल्याचा आरोप केला जातो, ही गोष्टच मला मुळात समजत नाही आणि याचा मला रागही येतो” अभिषेकचे हे वक्तव्य आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे,

सिमी ग्रेवालने हा व्हिडीओ सध्याच्या परिस्थितीमध्ये बच्चन कुटुंब आणि अभिषेकला होणाऱ्या ट्रोलिंगला उत्तर म्हणून शेअर केला असल्याचं म्हटलं जातं. कारण सिमी यांचे बच्चन कुटुंबासोबत फार जवळचे संबंध आहे. त्यामुळे त्यांनी याधीही बच्चन कुटुंबाला ट्रोल होताना पाहून तिच्या मुलाखतीमधला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आणि सत्य माहित नसताना कोणालीही असा दोष न देण्याची विनंतीही केली होती.