kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मला विजेचा शॉक लागत होता” अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती सीझन १६ मध्ये सांगिली ‘सारा जमाना’ गाण्याची आठवण

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा क्विझ शो कौन बनेगा करोडपती सीझन १६ मध्ये दिग्गज अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ सहभागी झालेल्या स्पर्धकांना आपले वेगवेगळे अनुभव सांगत असतात. शोमध्ये सध्या मध्य प्रदेशातील स्पर्धक स्वप्न चतुर्वेदीसोबत हा खेळत असून महानायक अमिताभ यांनी त्याला याराना चित्रपटातील “सारा जमाना’ गाण्याच्या चित्रीकरणाची आठवण सांगितल्यानंतर स्वप्न देखील आवाक झाला.

स्पर्धक स्वप्न म्हणाला ‘याराना’ हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे, जो मी पुन्हा पुन्हा पाहू शकतो, असे सांगून या चित्रपटाचे त्याने खूप कौतुक केले. स्वप्न याने अमिताभ यांचे कौतुक करून आपण किती अष्टपैलू पद्धतीने काम करता. याच प्रकारे मी काम करण्यचा प्रयत्न करतो, असे सांगितले. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “हम तो नौकरी के चक्कर में होते हैं, बस नौकरी मिल जाए!” (मी फक्त नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे!). त्यानंतर त्यांनी ‘सारा जमाना’ या प्रसिद्ध गाण्याची आठवण करून दिली आणि हे गाणे स्टेडियममध्ये शूट करण्याची त्यांची सूचना होती. कोलकात्यात तेव्हा नव्याने सुरू झालेले नेताजी सुभाषचंद्र स्टेडियम खूप मोठे होते आणि दिग्दर्शकांनी दिवसा चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चित्रीकरण पाहण्यासाठी सुमारे ५०,००० ते ६०,००० लोक आले होते, तर आसन क्षमता केवळ १२,००० ते १५,००० इतकी होती. यामुळे दिग्दर्शकांना चित्रीकरण थांबवून तेथून निघून जावे लागले. नंतर, अमिताभ बच्चन यांनी रात्रीच्या वेळी गुपचूप चित्रीकरण करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर ते शांतपणे रात्रीच्या चित्रीकरणासाठी कोलकात्याला परत गेले. त्यानंतर गर्दी कमी झाली. त्यावेळी तिथे प्रकाश पडण्यासाठी मी मेणबत्त्या ठेवण्याची कल्पना दिग्दर्शकाकडे मांडली. त्यानंतर रात्री त्यांनी गाण्याचे यशस्वी चित्रीकरण केले.

अमिताभ यांनी या वेळी त्यांच्या चर्चा झालेल्या प्रतिष्ठित पोशाखाबद्दल माहिती देताना सांगितले, “बिजली वाला जॅकेट” (इलेक्ट्रिक जॅकेट) बद्दल एक विनोदी किस्सा देखील सांगितला. त्यावेळी तंत्रज्ञान प्रगत नव्हते आणि गाण्यात घालायच्या जॅकेटवरील दिवे विजेला जोडलेल्या वायरद्वारे नियंत्रित केले जात होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या शरीराभोवती लाइट्सची संपूर्ण तार घातली होती, त्यांच्या पायातून वायर मागे पडली आणि मुख्य स्विचबोर्डमध्ये प्लग केली. “ज्या क्षणी वीज लावण्यात आली तेव्हा मी नाचू लागलो. मला हवे होते म्हणून नाही तर मला विजेचे झटके बसत होते म्हणून, असे अमिताभ यांनी सांगताच स्वप्नसह सर्वजण हसू लागले.

कौन बनेगा करोडपती सीझन १६ , रात्री ९ वाजता, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर अमिताभ बच्चन यांनी सांगितलेले विनोद आणि अविस्मरणीय क्षण पाहण्यास विसरू नका.