kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष यापार्श्वभूमीवर मैदानात उतरला आहे. यात अनेक ठिकाणी प्रचार सभेमधील वक्तव्य गाजत असताना दिसत आहेत. अनेक वक्तव्यांची चर्चा होत आहे. अशातच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पुढील 7 दिवसांत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि आम्ही सरकार पाडू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंब्रा येथे प्रचारसभेदरम्यान भाषण करताना त्यांना हा दावा केला आहे.

यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप ही नथुराम गोडसेची औलाद आहे. ज्यांना देशाची शांतता बिघडवायची आहे, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना 3000 हजार रुपये देऊ. महिलांवर अत्याचार करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि आमच्या लहान बहिणींनाही पूर्ण सुरक्षा दिली जाईल. सरकारकडे आमच्या पोलिसांना पगार द्यायला पैसे नाहीत, महागाई वाढली आहे. सरकारची तिजोरी रिकामी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून 7 दिवसांच्या आत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे हाच स्टेज शेअर करतो. मी म्हणतो रामगिरी महाराज भोंदू बाबा आहे. मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांना एकनाथ शिंदे संरक्षण देतात. रामगिरी महाराज तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसांना धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटलं की, काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे 400 लोकांच्या धर्मांतराच्या प्रकरणी मी पहिल्यांदा बोललो होतो. मी बोललो नसतो तर आमच्या मुंब्य्रातील 50 हून अधिक लोकांना उत्तर प्रदेश पोलिसांनी नेले असते, पण मी त्याला विरोध केला. पुढच्या 24 तासात उत्तर प्रदेश पोलिसांनी आपले विधान मागे घेतले आणि कोणतेही धर्मांतर झाले नसल्याचे सांगितले.