Breaking News

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ प्रसारित करण्यात येणार 13 ; दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून

डान्समधून अनेक प्रकारच्या भावना जागृत होतात. त्यामुळे डान्स हे भावनांच्या अभिव्यक्तीचे एक समर्थ आणि गतिशील माध्यम आहे. हा अनुभव घेण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 या डान्स रियालिटी शो चे स्वागत करण्यासाठी. उत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट आहे. यावेळी या शो मध्ये ग्लॅमरची भर घालण्यासाठी खुद्द करिश्मा कपूर परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सोबत मागच्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम करणारे टेरेन्स लुईस आणि गीता मा असतील. असामान्य प्रतिभा आणि अत्यंत चपळ डान्स मूव्ह्जचे दर्शन घडवण्याची हमी देणारा हा शो ‘जब दिल करे डान्स कर!’ अशी विनवणी प्रेक्षकांना करत आहे. फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी द्वारा निर्मित इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 मध्ये जय भानुशाली आणि माजी स्पर्धक अनिकेत चौहान मिळून सूत्रसंचालनाची धुरा सांभाळतील. हा शो 13 जुलै पासून सुरू होत असून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता तो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

ऑडिशन फेरीत अवघ्या 90 सेकंदात स्पर्धकांना तीन दमदार मूव्ह्ज दाखवून आपल्या ENT स्पेशलिस्ट परीक्षकांना प्रभावित करायचे होते. त्यानंतरच त्यांना पुढील फेरीत प्रवेश मिळणार होता. परफॉरमन्समधील मनोरंजन (एन्टरटेन्मेंट), नावीन्य (न्यूनेस) आणि तांत्रिक कौशल्य (टेकनिक) या निकषांवर त्यांची पारख करताना या सत्रात नव्याने दाखल झालेली परीक्षक करिश्मा कपूर परफॉरमन्समधील एकंदर ‘रंजकता’ तपासेल, गीता कपूरची नाविन्यावर बारीक नजर असेल आणि टेरेन्स लुईस स्पर्धकांची ‘टेकनिक’ची समज बघेल. या सत्रात ‘मौका या चौका’ हा एक आकर्षक टास्क दाखल करण्यात आला आहे. ज्या स्पर्धकांना परीक्षकांकडून बेस्ट बझर मिळेल, त्यांना हे आव्हान देण्यात येईल.स्पर्धकाने ‘मौका’ची निवड केली, तर त्याला मेगा ऑडिशनमध्ये न जाता थेट टॉप 12 मध्ये थेट दाखल होण्याची हमी मिळेल. तर ‘चौका’ निवडल्यास त्या स्पर्धकाला आता ज्यूरी पॅनलवर असलेल्या या शो मधल्या एका माजी स्पर्धकाशी जुगलबंदी करावी लागेल. त्यानंतर मेगा ऑडिशन असेल, ज्यामध्ये निवड होऊन आलेले स्पर्धक पुढच्या फेरीत जाण्यासाठी तिघा तिघांच्या जोडीत जुगलबंदी करतील. शेवटी असेल ग्रँड प्रीमियर. यामध्ये परीक्षक टॉप 12 स्पर्धकांची नावे ‘बेस्ट बारह’ म्हणून घोषित करतील. या 12 स्पर्धकांचा त्यांच्या-त्यांच्या मेंटरशी परिचय करून देण्यात येईल, ज्याच्या सोबतीने ते पुढील प्रवास करतील. दर आठवड्याला, हे स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करून ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ किताबाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत जातील.

प्रतिभा, वैविध्य आणि निखळ मनोरंजन यांचा गौरव करणारा इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 हा शो डान्स, अभिव्यक्ती आणि भावना यांचे अजब फ्यूजन सादर करण्याची हमी देतो. यातील स्पर्धक प्रेक्षकांना आकर्षित करून स्पर्धेतले आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. या स्पर्धेत कौशल्य आणि सृजनशीलता यांचे अफलातून दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा!

नवीन आणि प्रतिभावान स्पर्धकांना इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 मध्ये रोमांच आणि आकर्षण जिवंत करताना पहा, 13 जुलै पासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर !!

करिश्मा कपूर – परीक्षक
या सीझनमध्ये परीक्षक म्हणून दाखल होत असताना मी डान्स शैलीत होत चाललेले बदल आणि आपल्या स्पर्धकांची अमर्याद सर्जनशीलता बघण्यासाठी उत्सुक आहे. हा मंच केवळ स्पर्धकांच्या प्रतिभेला वाव देत नाही तर त्यांच्यातील इनोव्हेशन आणि चिकाटी या गुणांचे देखील संगोपन करतो. टेरेन्स आणि गीता सोबत हा प्रवास करण्यास मी आतुर आहे. परीक्षक म्हणून आमचा उद्देश स्पर्धकांना प्रेरित, सशक्त आणि प्रोत्साहित करून त्यांचा परफॉर्मन्स अधिक वरच्या पातळीवर घेऊन जाण्याचा आहे.

टेरेन्स लुईस – परीक्षक
इंडियाज बेस्ट डान्सरच्या सीझन 4 द्वारे आम्ही आणखी एका रोमांचक प्रवासाची सुरुवात करत आहोत. परीक्षकांच्या पॅनलवर परतताना मला खूप आनंद होत आहे. हा शो देशातल्या डान्स प्रेमींसाठी एक प्रेरणास्रोत आहे, जो देशातल्या उमलत्या प्रतिभेला चमकण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देतो. डान्स प्रकरांमध्ये कसे कसे बदल होत आहेत हे अनुभवताना आणि सर्जनशीलतेची नव्याने व्याख्या करणारे आल्हादक आणि इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स पाहताना धन्यता वाटते.

गीता कपूर – परीक्षक
इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 मध्ये सहभागी होताना मला खूप खूप आनंद होत आहे. प्रत्येक सीझन प्रतिभेची जणू नवी लाट घेऊन येतो आणि डान्सच्या कक्षा अधिकाधिक विस्तारतो. आपली अनोखी शैली आणि कहाणी या मंचावर घेऊन येणाऱ्या यंदाच्या स्पर्धकांमधले पॅशन आणि त्यांची निष्ठा बघण्यासाठी मी उत्सुक आहे. हा मंच डान्सच्या विविध शैलींचा गौरव करताना स्पर्धकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम अविरत करत आहे.