बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात हिंसाचार सुरु आहे. इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेविरोधात बांग्लादेशातील हिंदू समुदायाने त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. आज 3 डिसेंबर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच चिन्मय दास यांच्या वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आहे. चिन्मय दास यांचा खटला लढणारे वकील रमन रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सध्या ते रुग्णालयात आहेत. इस्कॉन कोलकाताचे प्रवक्ते राधाराम दास यांनी ही माहिती दिली.
राधाराम दास यांच्यानुसार, रमन रॉय यांची एकच चूक आहे, ते प्रभू चिन्मय यांचा खटला लढत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला. इस्लाम धर्मातील कट्टरपंथीयांनी वकीलच्या घरात घुसून तोडफोड केली असा राधाराम दास यांनी सांगितलं. वकिल रमन रॉय या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत, असं कोलकात्ता इस्कॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. सध्या ते ICU मध्ये असून जीवन-मरणाची लढाई लढत आहेत.
राधाराम दास यांनी रमन रॉय यांचा एक फोटो सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, रमन रॉय यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांची एकच चूक झाली, ते चिन्मय प्रभ यांचा खटला लढत होते. इस्लामिक कट्टरपंथीयांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली. त्यांच्यावर इतका भीषण हल्ला केला की, ते सध्या ICU मध्ये आहेत.
Please pray for Advocate Ramen Roy. His only ‘fault’ was defending Chinmoy Krishna Prabhu in court.
Islamists ransacked his home and brutally attacked him, leaving him in the ICU, fighting for his life.#SaveBangladeshiHindus #FreeChinmoyKrishnaPrabhu pic.twitter.com/uudpC10bpN
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) December 2, 2024
राधाराम दास काय म्हणाले?
एका बंगाली चॅनलशी बोलताना राधाराम दास म्हणाले की, वकील रॉय यांच्यावरील हल्ला हा चिन्मय कृष्ण प्रभू यांचा कायदेशीर खटला लढण्याचा परिणाम आहे. बांग्लादेशात धार्मिक अल्पसंख्यकांच्या अधिकाराचं रक्षण करणाऱ्यांना धोका वाढत असल्याच यातून दिसतं. प्रभू चिन्मय कृष्णा बांग्लादेश सम्मिलिता सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते एका रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेले. त्यावेळी त्यांना ढाका येथील हजरत शाहजलाल इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता.