kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Jhalak Dikhhla Jaa 11 Top 6 : विजेत्यांना बक्षीस म्हणून मिळणार चक्क…?

“झलक दिखला जा” शो आता अंतिम टप्प्यात आला असून फायनलची आता चर्चा रंगू लागली आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजेत्यांना काय बक्षीस मिळणार, त्यांना मिळणारी रक्कम किती मोठी आहे याविषयी देखील माहिती घेणार आहोत. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून झलक दिखला जा हा ट्रेंडिंगचा विषय आहे.

झलक दिखला जा चे होस्टिंग गोहर खान आणि ऋत्विक धनजानी हे करत असून त्यांनी यापूर्वी असे अनाउसमेंट केले होते की, विजेत्याला ट्रॉफी शिवाय अबू धाबीमध्ये एक पेड ट्रीप मिळणार आहे. तसेच विनिंग सेलिब्रेटीच्या पार्टनरला देखील या ट्रीपचा आनंद घेता येणार आहे. या रियॅलिटी शो मध्ये मलायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी परिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

शो च्या टॉप स्पर्धकांविषयी बोलायचे झाल्यास त्या लिस्टमध्ये शोएब इब्राहिम, शिव ठाकरे,मनिषा रानी, धनश्री वर्मा, श्रीरामा चंद्रा आणि अद्रिजा सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे. धनश्री आणि मनीषा राणीनं वाईल्ड कार्डद्वारे या शो मध्ये इंट्री केली होती. असं असलं तरी त्यांनी त्यांच्या डान्सनं चाहत्यांना जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी युजवेंद्रची पत्नी धनश्रीसाठी भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडुंनी खास पोस्ट शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच शोएब इब्राहिमसाठी त्याची पत्नी दीपिका कक्कड प्रेक्षकांना वोटिंगसाठी आवाहन करत आहे. शिव ठाकरेनं देखील त्याच्या डान्सनं प्रेक्षकांना जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे.