या सोमवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या अत्यंत लोकप्रिय झालेल्या ज्ञान-आधारित रियालिटी शोच्या 16 व्या सीझनमध्ये प्रेक्षकांचा परिचय धनबाद, झारखंडहून आलेल्या कौशलेन्द्र प्रताप सिंह या स्पर्धकाशी होईल. कौशलेन्द्र प्रताप सिंह हे सरकार आणि कोळसा खरेदी करणाऱ्यांमध्ये मध्यस्थाचे काम करतात. त्यांनी होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक आठवण शेअर केली.
हॉटसीटवर बसून खेळताना कौशलेन्द्र यांना एक जुनी गोष्ट आठवली. ती शेअर करताना ते म्हणाले, “कोळशाबद्दल आपण बोलत आहोत, तर मला आठवते आहे की, समस्त प्रांताला हादरवून सोडणाऱ्या झरिया चासनाला खाणीतील दुर्घटनेनंतर तुम्ही ‘काला पत्थर’ चित्रपट केला होता.” त्यांनी पुढे सांगितले की, ती दुर्घटना एक धरण फुटल्यामुळे झाली होती. आणि चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दूषित पाणी अमिताभ बच्चन यांच्या अंगावर फवारण्यात आले होते, ज्याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला होता. असे असूनही विश्रांती न घेता श्री. बच्चन यांनी आपले शूटिंग चालू ठेवले आणि आपल्या निष्ठेची आणि लवचिकतेची प्रचिती दिली.
त्यानंतर कौशलेन्द्र यांनी सांगितले की, या घटनेविषयी अमिताभ बच्चन यांचे वडील, हरिवंश राय बच्चन यांनी एका पुस्तकात लिहिले आहे. त्या पुस्तकात बिग बींना असलेल्या एका सवयीचा उल्लेख आहे. ही सवय म्हणजे जेवताना ते नेहमी उत्तरेकडे तोंड करतात. या सवयीचा संबंध महाभारताशी आहे, ज्यात असे म्हटले आहे की, “जो उत्तरेकडे तोंड करून जेवतो, त्याला सत्य प्राप्ती होते.” हरिवंश राय बच्चन यांनी सुंदर लिहिले आहे की, “मला वाटते की, सत्याची गरज मला आहे आणि अमिताभला दीर्घायुची!” पुढे त्यात हरिवंश राय जींनी असेही सुचवले आहे की, जर अमिताभ जेवताना त्यांच्या जागेवर बसला, तर सत्य आणि दीर्घायु यांच्या अदला बदलीचा दोघांना फायदा होईल!
यावर प्रतिसाद देताना अमिताभ बच्चन यांनी विनम्रतेने नकार देत म्हटले, “नाही.. नाही, जर सत्य आणि दीर्घायु यांच्यात निवड करण्याची माझ्यावर वेळ आली तर सत्याच्या बदल्यात मी दीर्घायुची इच्छा कधीच करणार नाही.”
एक हृद्य आठवण सांगत अमिताभ बच्चन यांनी संभाषणाचा समारोप केला. ते म्हणाले, “आमच्या घरचे डायनिंग टेबल गोलाकार होते. मी जेथे बसायचो ती उत्तराभिमुख बाजू होती. तर बाबूजींचे
तोंड पूर्वेकडे असायचे.” त्यांना आपल्या वडीलांचे हे शब्दही आठवले की, “तू आयुष्मान हो, आमच्यासाठी हेच पुरेसे आहे.”
बघा ‘कौन बनेगा करोडपती 16’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!