kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

    यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या की राणे यांनी प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, भाजप आणि आता त्यांचे जेष्ठ सुपुत्र निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत,त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होते. त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले. 

     यावेळी माधवी कदम,महेंद्र कदम,लोकेश कदम,नीलम कदम,उषादेवी कदम ,सुषमा कदम,युवराज कदम,मिथिलेश कदम, रघुनाथ कदम,विशाखा कदम,विरेश कदम, विश्वनाथ कदम,दयावती कदम,मंगेश कदम, आयुष कदम,यतिका कदम या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

     याप्रसंगी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर,आयवान,फर्नांडिस, उपसरपंच राजेंद्र कदम, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर,अमोल परब,दीपक परुळेकर,विकास आचरेकर,सागर कदम,नितीन परब रोहन राणे,हर्षद पावसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.