या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये एक जबरदस्त एपिसोड बघायला मिळणार आहे. हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात जेव्हा दोन टीम्सची टक्कर होईल तेव्हा मलाइका अरोरा आपल्या इंडियाज बेस्ट डान्सरच्या टीमला आणि गीता सुपर डान्सरच्या छोट्या उस्तादांना जोरदार पाठिंबा देताना दिसेल. लॉर्ड ऑफ डान्स रेमो डिसूझा प्रमुख परीक्षक म्हणून काम करेल. या शोमध्ये एकूण बारा सहभागी आहेत – इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर या दोन्ही शोजमधले प्रत्येकी सहा-सहा! या स्पर्धकांना दोन टीम्समध्ये विभाजित करण्यात आले आहेत. आणि प्रत्येक टीमचे नेतृत्व करण्यासाठी तीन प्रसिद्ध कोरिओग्राफर्स आहेत.
रेमो डिसूझाच्या ‘पहिया-ए-परेशानी’ व्हीलने दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना एक अनोखे आव्हान दिल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष पेटला. ‘गाना एक डान्स अनेक’ असे हे आव्हान होते. आणि नियम? सर्व प्रतिभावान डान्सर्सना ‘जिस देश में गंगा रहता है’ चित्रपटातल्या ‘प्रेम जाल’ गाण्यावरच परफॉर्म करायचे होते, पण आपल्या परफॉर्मन्समधून दोन वेगळ्या शैली दाखवायच्या असे हे आव्हान होते. या गाण्याला सर्वोत्तम न्याय कोणी दिला हे मग परीक्षक ठरवणार. मलाइकाने आपल्या टीममधून देवपर्णा या अत्यंत लवचिक शरीराच्या मुलीला निवडले. तर, सुपर डान्सर टीमची मालकीण गीता कपूर हिने तुषार आणि रूपसा म्हणजे ‘तुरूप’ यांना आपल्या टीमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले.
देवपर्णाने नाट्यमय एंट्री घेत अनेक स्टंट केले, जे हृदयाची धडधड वाढवणारे होते. तिचा तो आगळावेगळा दृष्टिकोन पाहून रेमो डिसूझा खूपच प्रभावित झाला. तो म्हणाला, “तू उभे केलेले स्पाइडरमॅन हे पात्र विलक्षण होते. तू ज्या रीतीने त्यात उप-शास्त्रीय अंग आणलेस ते अप्रतिम होते. तुला दिलेल्या गाण्याला तू योग्य न्याय दिलास. परंतु, गीता मात्र तितकी प्रभावित झाली नव्हती. ती म्हणाली, “तुझी एंट्री मस्त होती, पण पण डान्सिंग बीट्समध्ये स्पष्टता दिसली नाही. स्टंट मस्त होते पण डान्सचा जो भाग होता, त्यात ती धार दिसली नाही. तुझा प्रयत्न उत्तम होता, पण तो पुरेसा स्पष्ट नव्हता. विशेषतः बदलताना!” साहजिकच मलाइका गीताच्या टिप्पणीचा विरोध करत म्हणाली, “मी गीताशी सहमत नाही. तिला जे वाटते आहे, ते मी समजू शकते, पण माझ्यासाठी हा परफॉर्मन्स दमदार होता. बघू या, पुढे काय होते.”
त्यानंतर तुषार आणि रूपसाची पाळी होती. त्यांनी याच गाण्यात आपला वेगळाच ढंग आणला. या परफॉर्मन्समध्ये पराकोटीची ऊर्जा आणि धाडसी स्टंट होते. पण मलाइकाला तुषारची ऊर्जा पुरेशी वाटली नाही. तिने कठोर टिप्पणी करत सांगितले, “रूपसा, तुझी ऊर्जा पुरेपूर होती. आणि डान्स करताना तू अगदी परिपक्व दिसलीस. पण तुषार, आज तुझी ऊर्जा मंद होती. धूर, दिवे, आग आणि वारा यांसारख्या प्रॉप्सच्या मागे तुम्ही लपू शकत नाही. त्यांच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स अधिक उठावदार होऊ शकतो, पण त्या कुबड्या आहेत. आम्हाला तुझा अस्सल डान्स दाखव.” आपल्या टीमची बाजू घेत गीता म्हणाली, “जर तू प्रॉप्सना कुबड्या म्हणत असशील, तर मी म्हणेन, की तुम्ही युक्त्यांच्या मागे लपू शकत नाही. यांचा परफॉर्मन्स नुसता स्टंट नाही, तर डान्स होता.”
या तापलेल्या वादावादीत मध्यस्थाची भूमिका घेत रेमोने दोन्ही टीम्सच्या मालकिणींशी आपण सहमत नाही असे नमूद केले. तो म्हणाला, “दोन्ही परफॉर्मन्समध्ये दोन आगळेवेगळे दृष्टिकोन होते. त्यांचा प्रकार आणि संकल्पना भिन्न होत्या. पण मुद्दा हा आहे की कोणी या गाण्याला अधिक चांगला न्याय दिला. शरीराची लवचिकता दाखवण्याचा प्रकार डान्समध्ये असतो. तुम्ही त्याला स्टंट म्हणू शकत नाही आणि देवपर्णाने उत्तम परफॉर्म केले. दोन्ही टीम्सची कामगिरी उत्कृष्ट होती, पण मलाइका तुषारबद्दल म्हणाली, ते मला पटले नाही. मला तर वाटते की त्याचा परफॉर्मन्स अफलातून होता.”
अजिबात चुकवू नका, “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” शनिवारी आणि रविवारी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!