राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पक्षाकडून आपल्या जाहीरनाम्याला प्रतिज्ञापत्र असं नाव देण्यात आलं आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती नियंत्रणात आणणार, महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार यासोबतच अग्निवीर सारखे धोरण रद्द करणार असे अनेक आश्वासनं पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले आहेत.

  • महिलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे करून राजकारणातील महिलांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला जाईल.
  • सरकारी क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचे धोरण थांबवण्यात येईल.
  • जात जनगणनेला पाठिंबा आहे. संख्येनुसार आरक्षण देऊन ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण नेण्याचे धोरण आम्ही अवलंबू आणि कायद्यानुसार ते मंजूर करावे, अशी मागणी करणार आहोत.
  • त्याचा आढावा घेऊन खासगीकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न करू. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न
  • सैन्यातील अग्निवीर सारखी पॉलीस रद्द करणार
  • एक राष्ट्र, एक निवडणूक सध्या शक्य नाही. न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न.
  • गेल्या दहा वर्षात विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान या जाहीरनाम्यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की सहज शक्य असताना स्वाभिमानासाठी महासत्तेपुढे न झुकण्याचा पवित्रा पवार साहेबांनी स्वीकारला. यामुळेच आज आम्ही 10 पैकी 8 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहोत.