तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली.
या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा जण हे इमारतीच्या लीफ्ट मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. यानंतर तात्काळ त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अग्निशमन विभागाकडून रुग्णालयात शोध आणि बचाव कार्य सुरू असताना या पीडितांचा लीफ्टमध्ये श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला होता.